About the Book:
आयुष्य जगताना जोडली जातात अनेक नाती-गोती...
काळाच्या प्रवाहात वाहत जातात त्यातली कित्येक नाती...
पैशामागे धावताना माणूस विसरतो रक्ताची नाती...
नव ते हवं या प्रमाणे नवीन नाती जपताना जुनी नाती मात्र हळूच निसटून जाती...
कोण आपले, कोण परके ना कोणास कळती...
टिकून राहती तीच नाती जे करीती खोटी स्तुती...
भल्या गर्दीत पडे एकटा ज्यास न जमली ही कॄती...
जुन्या आठवांच्या स्मॄतीमध्येच काहीजण रमून जाती...
तर काही मात्र नव्या नात्याच्या मागे मागे धावती...
कोणी नाही कोणाचे हे जरी असले खरे...
तरी मन हे वेडे मात्र उगाच अपेक्षा करते का बरे?
भंग होता त्या अपेक्षांचा, नकळत ओल्या होतात कडा...
तुटलेल्या या नात्यातून माणूस मात्र नक्कीच शिकतो एक धडा...
असली जरी रक्ताची नाती तरी लोकं मात्र पैसा असे त्यालाच पुसती...
पैसा आणि स्टेटस जपणारी दिखाऊ नाती...
ह्या साऱ्या मधून हरवून जाती खरी अनमोल नाती...
आपले आयुष्य म्हणजे अनेक नात्यांच्या कडू-गोड आठवणींचे मिश्र लोणचं असते...या लोणच्यात आवश्यक असतो तो शब्दांचा खार...तो नेहमी जपून वापरावा लागतो, कारण जास्त प्रमाणात झाला तर आयुष्यातील नात्यांचं लोणचं खराब होतं...कमी प्रमाणात झाला तर ते लोणचे चांगले मुरत नाही... म्हणून चांगल्या वाईट कोणत्याही प्रसंगी शब्द हे नेहमी जपून वापरावे लागतात. कुठे, कसं आणि किती शब्द वापरायचे याचे प्रमाण एकदा समजले की, आपल्या आयुष्यातील अनेक नात्यांचे मिश्र लोणचे रुचकर होत जाते अन चांगले मुरते.