Anil RajvanshiAbout the Author: अनिल राजवंशी पेशाने यांत्रिकी अभियंत6; आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील बी. टेक्. पदवी त्यांना आयआयटी कानपूरमधून तर पी.एच्.डी. अमेरिकेतील गेन्सव्हिलस्थित युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॅारिडामधून मिळाली. ते आणि त्यांची पत्नी नंदिनी निंबकर (त्याही अमेरिकेत शिकलेल्या शास्त्रज्ञ आहेत) निंबकर ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) नावाची ग्रामीण भारतातल्या फलटण या तालुक्याच्या गावी असलेली एका लहानशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित गैर-सरकारी संस्था चालवतात. ते नवीकरणीय ऊर्जा, ग्रामीण आणि शाश्वत विकास व अध्यात्म या क्षेत्रांत संशोधन करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांनी या विषयावर व्यापक स्वरुपात लिहिले आहे. त्यांच्या नावावर २५० लेख, ७ पेटंट आणि ५ पुस्तके आहेत. त्यांच्या कामासाठी २०२२ सालच्या पद्मश्रीसह त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी अध्यात्म, तंत्रज्ञान आणि शाश्वतता या विषयावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code